Important Notice for all Women Shraddhavan regarding Prapatti
श्रध्दावान दरवर्षी ”श्रीवर्धमान व्रताधिराज” नेमाने करतात. ह्या वर्षी हे व्रत सोमवार दिनांक १६ डिसेंबर २०१३ रोजी (श्रीदत्तजयंतीच्या दिवशी) सुरु होऊन मंगळवार दिनांक १४ जानेवारी २०१४ रोजी संपन्न होणार आहे.
बर्याच स्त्रियांनी हे निदर्शनास आणले की ”मंगळवार दिनांक १४ जानेवारी हा स्त्रियांसाठी असलेल्या ”श्रीमंगलचण्डिका प्रपत्तीचा” दिवस असून त्याचदिवशी, ”श्रीवर्धमान व्रताचे” उद्यापन ही करावयाचे आहे व दोन्ही एकाच वेळेस करणे कठीण होईल. ह्या सर्व श्रध्दावान स्त्रियांच्या सोईसाठी परमपूज्य सद्गुरुंनी खालील प्रकारे मार्गदर्शन केले आहे.
”ज्या स्त्रिया मंगळवार दिनांक १४ जानेवारी २०१४ ह्या दिवशी ”श्री मंगलचण्डिका प्रपत्ती” करणार आहेत त्यांनी व्रताचे उद्यापन बुधवार दिनांक १५ जानेवारी २०१४ रोजी केले तरी चालणार आहे. त्यामुळे ”श्रीवर्धमान व्रताधिराज” उद्यापनात खंड धरला जाणार नाही, अश्या स्त्री श्रध्दावान भक्तांना श्री मंगलचण्डिका प्रपत्तीच्या दिवशी ३० वेळा पठण अथवा उद्यापन करणे आवश्यक नाही.
0 comments: