SHREE MANGAL CHANDIKA PRAPATTI
सद्गुरुंचे अकारण कारुण्य सदैव आपल्या
श्रद्धावान भक्तांचा विकास कसा करता येईल यासाठीच आतूर असते. त्यासाठी ते सदैव
विविध मार्ग आपल्याला उपलब्ध करून देत असतात. यातूनच सद्गुरु श्री अनिरुद्धांनी रामराज्य
ही संकल्पना आपणास नीट समजावून सांगितली. रामराज्य म्हणजे जसे राज्य रामाने
अयोध्येत चालवले तसे राज्य. अयोध्येतले नागरिक जसे होते, तसे सर्वानी बनणे, तशी
समाजव्यवस्था तयार होणे, प्रत्येक व्यक्ती तशी तयार होणे म्हणजेच रामराज्य. पण ते
आपल्या जीवनात कसे प्रगटवायचे, यासाठी अगदी वैयक्तीक स्तरापासून ते सामाजिक,
धार्मिक स्तरावर कोणकोणत्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या याविषयी सद्गुरुंनी मार्गदर्शन
केले. यातीलच एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे
v स्त्रियांसाठी असलेली श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती
व
v पुरुषांसाठी श्रीरणचण्डिकाप्रपत्ती.
“प्रपत्ती म्हणजेच आपत्तीनिवारण करणारी शरणागती.”
प्रत्येक स्त्री व पुरुषांना आदिमाता चण्डिका
महिषासुरमर्दिनीचे पराक्रमी सैनिक बनवून प्रापंचिक तसेच अध्यात्मिक, सामाजिक
जबाबदा–या समर्थपणे पार पाडण्यासाठी लागणाऱ्या उर्जेचा अव्याहत स्त्रोत पुरविणारी
ही प्रपत्ती.
श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती
असो किंवा श्री रणचण्डिकाप्रपत्ती तिची पाच अत्यंत महत्वाची अंगे आहेत.
1.
आदिमाता
चण्डिका महिषासुरमर्दिनी ही परम्यात्म्याची माता आहे आणि त्यामुळे हा परमात्मा
सदैव तिला शरण असतो व म्हणूनच मलाही तिला शरण जाणे अत्यावश्यक आहे.
2.
चण्डिका
ही स्वतःही व आपल्या लाडक्या पुत्राकरवी माझे रक्षण करीलच असा विश्वास बाळगणे व
वारंवार व्यक्त करणे.
3.
चण्डिकेच्या
पुत्राचे आश्रयत्व स्वीकारणे, त्याचे नित्य स्मरण करणे, त्याच्या आज्ञेत राहणे,
तोच एकमेव माझा आधार आहे ह्या निष्ठेने जगणे. हा प्रपत्तीचा अत्यंत महत्वाचा भाग
आहे.
4.
चण्डिकेने
आपल्याला जवळ घेऊन परम्यात्म्याच्या हाती सोपवावे अशी याचना करणे. माय चण्डिके, तू
मला स्वतःजवळ घे आणि मला परम्यात्म्याच्या हाती सोपव अशी चण्डिकेला प्रार्थना करणे.
5.
आई चण्डिकेच्या कृपेने अधिकाधिक भक्ती संपादन करून प्रपंच व अध्यात्म यशस्वी होण्यासाठी, सुफल
संपूर्ण होण्यासाठी चण्डिकेला शरण जाणे.
ही ५ तत्वे धारण करूनच श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती
व श्री रणचण्डिकाप्रपत्ती ही प्रपत्ती केली जातात.
·
श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती
ही संक्रांतीच्या दिवशी केली जाते. कारण याच दिवशी श्री आदिमाता महिषासुरमर्दिनीने
सूर्यास्तानंतर ऋषी कर्दम व देवहूती यांच्या कतराज आश्रमामध्ये पहिले पाऊल ठेवले.
म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर ही प्रपत्ती केली जाते.
·
ही
प्रपत्ती आपण मोकळ्या जागेतच करायची असते. उदा. सुमद्रकिनारी, नदीकिनारी,चौकातल्या
जागी, घराच्या बाल्कनीमध्ये,चाळीच्या
कठड्याजवळ अशा प्रकारे खुल्या जागेतच करणे आवश्यक आहे. या प्रपात्तीसाठी जेवढ्या
जास्त स्त्रिया येतील तेवढे चांगले. १६ वर्षावरील कुठलीही स्त्री हे व्रत करू शकते
तसेच १ वर्ष केले म्हणजे प्रत्येक वर्षी हे व्रत केलेच पाहिजे असे मुळीच नाही. पण
जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे भले ते असेल तर हे व्रत दरवर्षी करायलाच हवं.
प्रपत्तीची मांडणी :-
v
एका चौरंगावर किंवा पाटावर मोठी परात घ्यावी.
v
परातीत गहू, त्यावर कळशी किंवा कलश, त्याच्यामध्ये तांदूळ घालावेत.
v
या कळशीवर ताम्हन ठेऊन त्यात देवीची दोन पाऊले. उजवं पाऊल कुंकवाच, डाव पाऊल हळदीच अशी काढावी.
प्रपत्ती पूजाद्रव्ये
:
·
एक
तबक.
·
त्यात
1.
शेवग्याच्या
शेंगा,
2.
केळी,
4.
नारळ,
5.
गाजर,
6.
मुळा
किंवा तोंडली,
7.
उडदाची
डाळ,
8.
तिळाचे
तेल,
9.
दही,
10.
हळद,
11.
आले,
12.
गूळ,
13.
चिंच,
14.
ऊसाचे
कांडे,
15.
अभिचारनाशक
पुरचुंडी
(विड्याचे पान,त्यामध्ये मीठ, मोहरी आणि कापूर हे घालून त्या पानाला दोरीने बांधायचे)
16. सुगंधित फूले
प्रपत्ती कशी करावी :-
v सर्व स्त्रिया हातात तबक घेऊन पूजेच्या मांडणीसमोर उभ्या राहतील व सर्वात वयाने ज्येष्ठ स्त्रीच्या हातात आरतीचे तबक द्यावयाचे. सर्वानी “मातेगायत्री सिंहारूढ भगवती.....” ही मोठ्या आईची आरती करावी.
v त्यानंतर तबक हातात घेऊन सर्व स्त्रियांनी माता चंडिकेच्या पदचिन्हस्थानास अर्थात कतराज आश्रमास फेर
धरल्याप्रमाणे नऊ प्रदक्षिणा घालायच्या व ह्या प्रदक्षिणा घालत असताना श्री
गुरुक्षेत्रम् मंत्र मोठ्याने म्हणायचा.
v प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर त्या पुरचुंडीने त्रिविक्रमाची दृष्ट काढायची आणि त्याला
सांगायचे, बाबारे माझ्या घरावर असणारी कुठलीही कुदृष्टी, कुबुद्धी ह्या सगळ्यांचा
तू तुझ्या आईच्या सहाय्याने नाश कर.
v मग ती पुरचुंडी परातीत किंवा होमकुंडात किंवा खड्ड्यात, कापूर आणि काठ्यांच्या सहाय्याने जो अग्नी निर्माण केलं असेल त्यामध्ये
ही पुरचुंडी अर्पण करायची. हा निर्माण केलेला अग्नी म्हणजेच आदिमाता
महिषासूरमर्दिनीचे तेजोवलयम्
या कृतीने आपण त्रिविक्रमावर जबाबदारी
टाकतो – “तू माझ्या घराला लागणारी सर्व बाधा दूर कर.“
इथे श्रीगुरुक्षेत्रम् मंत्रामुळे त्या अग्नीचे
रुपांतरण तेजोवलयम् मध्ये झालेले असेल.तुमच्या घरावर असलेली कुदृष्टी, कुबुद्धी, कुकर्म
ह्या तेजोवलयम् मध्ये गेल्यामुळे तुमच्या घराचे कल्याण होईल अशी ग्वाही सद्गुरू
श्री अनिरुद्धानी आपल्याला दिली आहे.
v पूजा समाप्त झाल्यावर “ ओम ऐम् –हिम क्लीं चामुण्डाये विच्चे हा
मंत्र नऊ वेळा म्हणत सर्व स्त्रियांनी आदिमातेच्या पावलांवर अक्षता वहाव्यात व
त्रिविक्रमास सुगंधी फुले अर्पण करावीत व तेजोवलयमच्या अग्नीस कडूलिंबाच्या
पाल्याने शांत करावे.
v जमलेल्या सर्व स्त्रियांनी त्या पावलातील हळद कुंकू घरी न नेता स्वतःच्या कपाळास किंवा ज्यांना कपाळाला लावायला भीती वाटत
असेल त्यानी गळ्याला लावावे. घरी अजिबात नेऊ नये.
v तबकातील केळी आदिमातेला अर्पण करावी व त्याचा एकत्रित प्रसाद करून सर्व स्त्रियांनी घरी न नेता तेथेच खावा.
v दही घरी नेऊन घरातील पुरुषांना प्रसाद म्हणून द्यावा. स्त्रियांनी दही खाऊ नये. जर काही कारणास्तव घरात पुरुषमंडळी नसतील तर ते दही कुठल्याही वृक्षाच्या मुळाशी अर्पण करावे.
v उस घरी नेऊन स्वतः खावा व घरातील इतर स्त्रियांनाही द्यावा. तो त्या दिवशी थोडा तरी खावा, मात्र तो त्याच दिवशी खाऊन संपविला पाहिजे असे बंधन नाही.
v उरलेल्या प्रपत्ती पूजाद्रव्याचे सांबार बनवून ते त्याच रात्री घरातील स्त्रिया व पुरुषांनी पोळी आणि भाताबरोबर खावे. सांबार तयार करण्यासाठी त्यात मसाल्याचा वापर करण्यास हरकत नाही., तसेच चवीसाठी व आरोग्यासाठी त्यात कडीपत्ता जरूर घालावा. मात्र ह्या दिवशी इतर कुठलीही भाजी करू नये.
प्रपत्ती करण्यामागचे महत्व :-
v हे व्रत करणाऱ्या स्त्रिया आदिमाता चण्डिकेच्या सैनिक बनतात, स्वतःच्या गृहरक्षणासाठी,स्वतःच्या आप्तांच्या रक्षणासाठी.स्त्रियांना जरा कुठे मुलाला शाळेतून यायला उशीर झालं लगेच काळजी वाटू लागते, मुलगा कुठल्या फालतू मुलीच्या प्रेमात पडला कि काळजी वाटते, मुलगी नको त्या माणसाबरोबर पळून जाते, काळजी वाटते. पण हे रक्षण करण्याचे काम आज स्त्री करू शकेल. ती अबला राहणार नाही, दुर्बल राहणार नाही. ती स्वतःच्या घराच्या रक्षण करण्यासाठी स्वतः समर्थ बनेल.
प.पू. श्री. अनिरुद्ध बापू
//अम्बज्ञ//
-Ambadnya Pranjalveera Deshpande
0 comments: